Tuesday, 4 October 2016

आज दिनांक 04-10-2016 माळशिरस तालूक्याचे गटविकास आधिकारी मा.श्री.माडकर साहेब यांनी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा,कोंडबावी व ग्रांमपंचायत कोंडबावीस  अचानक भेट दिली. भेटीनंतर साहेबांनी गावातील शौचालयाविषयीचा आढावा घेतला.गावाचा भौगोलिक परिसर छान आहे त्यांचा गावानी उपयोग करुन घ्या असे सरपंच ,उपसरपंच गावातील लोकांना मार्गदर्शन केले. गावात सध्या किती शौचालय आहेत हे त्यांनी स्वताः जावून प्रत्यक्ष पाहिले.हे पाहताना शाळेकडे आले शालेय परिसर स्वच्छता पाहून , परिसरातील वृक्षारोपन पाहून खुष झाले.त्यांच बरोबर शाळेच्या समोरील बोअरवेल व त्यांचे जलपूर्नभरण केलेले पाहून सर्वांचे कौतुक केले.याच पध्दतीने सर्वांनी केले तर पुढील काळात पाण्यांची टंचाई होणार नाही हे महत्त्वाचे सांगितले.सर्व शिक्षकांचे कौतुक केले.!!!!!

Monday, 12 September 2016


आज दिनांक  12 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कोंडबावी मध्ये  सौ.अर्चना  वाघ मँडम यांनी मुलांना कार्यानूभव कार्य शाळा अंर्तगत कागदापासून फुलापाखरु तयार करण्यास शिकविले.या मध्ये  इयत्ता 1 ली ते    7 वी पर्यत च्या सर्वच  मुला मुलींनी  भाग घेऊन फुलपाखरु शिकण्यांचा आनंद घेतला.त्यावेळी अनेक रंगीबेरंगी कागदांची फुलापाखरे  तयार करण्यात आली.या साठी शाळेतील सर्व  शिक्षकांनी  सहकार्य  केले.विशेष  मुख्याध्यापक श्रीम.तळेकर मँडमने सौ.वाघ मँडमचे कौतुक केले.या मध्ये श्री.लक्ष्मण वाघ गुरूजी ,श्री.बिंदू खाडे गुरूजी ,श्रीम.वासंती देशपांडे मँडम आणि श्रीम.मीना पाटील मँडम यांनी भाग घेऊन मुलांचे कौतुक करत वाघ मँडमचे पण कौतुक केले.

Thursday, 8 September 2016

आज कोंडबावी गावामध्ये एक शाँर्ट फिल्मचे उदघाटन करुन काही शाँटपण घेण्यात आले. गावातील शाळा , गावामध्ये असणारे उंचीवरील महादेवाचे मंदिर या ठिकाणाचे चित्रीकरण करण्यात आले.या मध्ये शाळा सुटल्याचा भाग घेतला आहे.यामुळे मुलांना सिनेमाचे चित्रीकरण कसे होते हे मुलांना जवळून पाहता आला.या शाँर्ट फिल्मचे उदघाटन  गावचे संरपच श्री.मधुकर माने, उपसरपंच श्री.विष्णू घाडगे ,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.बापूराव घाडगे ,उपाध्यक्ष श्री.शिवाजी नामदास  या सर्वाच्या हस्ते करण्यात आले.या मध्ये काही गावातील कलाकार आहेत,सातारा  मधील,शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज मधील विद्यार्थी आहेत.सर्वाना पुढील कार्यस शुभेच्छा दिल्या .

Tuesday, 30 August 2016

सुस्वा-गतम

आमच्या शाळेकडून आपले साहर्ष  स्वागत आहे.