Tuesday, 4 October 2016

आज दिनांक 04-10-2016 माळशिरस तालूक्याचे गटविकास आधिकारी मा.श्री.माडकर साहेब यांनी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा,कोंडबावी व ग्रांमपंचायत कोंडबावीस  अचानक भेट दिली. भेटीनंतर साहेबांनी गावातील शौचालयाविषयीचा आढावा घेतला.गावाचा भौगोलिक परिसर छान आहे त्यांचा गावानी उपयोग करुन घ्या असे सरपंच ,उपसरपंच गावातील लोकांना मार्गदर्शन केले. गावात सध्या किती शौचालय आहेत हे त्यांनी स्वताः जावून प्रत्यक्ष पाहिले.हे पाहताना शाळेकडे आले शालेय परिसर स्वच्छता पाहून , परिसरातील वृक्षारोपन पाहून खुष झाले.त्यांच बरोबर शाळेच्या समोरील बोअरवेल व त्यांचे जलपूर्नभरण केलेले पाहून सर्वांचे कौतुक केले.याच पध्दतीने सर्वांनी केले तर पुढील काळात पाण्यांची टंचाई होणार नाही हे महत्त्वाचे सांगितले.सर्व शिक्षकांचे कौतुक केले.!!!!!